छत्रपती संभाजीनगर हादरलं! गळाभेट घेण्याचा बहाणा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला
छत्रपती संभाजीनगर गुन्हा : छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात गळाभेटीच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आरोपीने गळाभेट घेत अचानक चाकूने गळ्यावर वार केल्याची तक्रार
रविवारी रात्री उशिरा आरोपी राम बोडखे याने अंबादास म्हस्के यांना फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर बाबा पेट्रोलपंप चौकात भेट झाल्यानंतर “मजाक करत होतो” असे म्हणत आरोपीने गळाभेट घेत अचानक चाकूने गळ्यावर वार केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार
गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना, पतीनं पत्नीला संपवलं
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या पत्नीची चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या करून आरोपी पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा रोडवर आज दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेनं बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपीला पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, कौटुंबिक करणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील याने आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली. वाद चिघळताच संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या धनश्री पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश आणि धनश्री हे दोघेही खाजगी बँकेमध्ये काम करत होते. याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपी ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.