पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईड फुटला, चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी
पोलीस मुख्यालयात मॉकड्रिल सुरू असतानाच हँड ग्रेनाईड फुटल्याची घटना सोमवारी सकाळी अहिल्यानगरमध्ये घडली. यात चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी झाले आहेत. शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मधे आणि योगेश सोळुंके अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. घटनेनंतर संपूर्ण पोलीस मुख्यालयात एकच गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस मुख्यालयात सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मॉक ड्रिल घेण्यात आली होती. हातात हँड ग्रेनाईड घेऊन हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असताना ते हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेत दोन पोलीस कर्मचार्यांची करंगळी तुटली आहे. तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी कर्मचार्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणार्या या ग्रॅनाईडची पीन काढल्यानंतर संबंधित जवानांकडून लिव्हर सुटल्याने हा अपघाती स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Comments are closed.