हिंदुस्थान ‘नरक’ असल्याच्या विधानावरून अमेरिकेचे घुमजाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान नरक असल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून अमेरिकेने घुमजाव केले आहे. या सगळ्या सोशल मीडियातील निरर्थक गोष्टी आहेत, असे स्पष्टीकरण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज केले.

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एका कार्यक्रमात हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माकाx रुबियो आणि उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी ट्रम्प यांनी केलेल्या विधानाकडे रुबियो यांचे लक्ष वेधले. त्यावर, जगातील प्रत्येक देशात लोक सोशल मीडियात वाह्यात गोष्टी बोलत असतात. त्यांना चेहरा नसतो. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ट्रम्प यांचे हिंदुस्थानवर प्रेम आहे. ते हिंदुस्थानचे प्रशंसक आहेत,’ असे रुबियो म्हणाले.

ट्रम्प म्हणाले, मी मोदींचा फॅन

याच कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकेचे हिंदुस्थानातील राजदूत सर्जियो गोर यांना फोन केला. गोर यांनी ट्रम्प यांचा फोन स्पिकरवर ठेवला. फोनवर बोलताना ट्रम्प यांनी मोदींची स्तुती केली. ‘नरेंद्र मोदी यांचा मी चाहता आहे. हिंदुस्थान आणि अमेरिकेची इतकी जवळीक याआधी कधीच नव्हती. हिंदुस्थानी जनता माझ्यावर आणि अमेरिकेवर पूर्ण विश्वास ठेवू शकते,’’ असे ट्रम्प म्हणाले.

Comments are closed.