एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत
मराठी and Amit Shah meet: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी कोणालाही जराही सुगावा लागू न देता दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (मराठी) आणि अमित शाह यांची ही भेट दिल्लीत रविवारी पार पडल्याचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी कोणालाही कळून देता अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या भेटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट आणि माजी मंत्री होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीविषयी चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics news)
प्राथमिक माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा फक्त दोन दिवसांचा होता. या काळात एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अमित शाह यांची वेळ मिळू न शकल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. त्यामुळे अमित शाह यांनी शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटीसाठी येण्याचा निरोप पाठवला. त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता खासगी विमानाने दिल्लीत पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगली होती की, त्यांच्यासोबत एकही सहाय्यक नव्हता. अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी बंगळुरुला गेले आणि तिथून ते ठाण्यात परतल्याचे सांगितले जाते.
मराठी: एकनाथ शिंदे यांची तब्येत प्रचंड अस्वस्थ?
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीतील भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना तातडीने अमित शाह यांची भेट हवी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अमित शाह यांचा निरोप आल्यावर तातडीने खासगी विमानाने दिल्लीला पोहोचले. महायुतीमध्ये शिंदे गटाची कोंडी असल्याची भावना एकनाथ शिंदे यांच्या मनात आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून पक्षाचा विस्तार करण्याची एकनाथ शिंदे यांनी योजना आहे. मात्र, त्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याच चर्चा झाल्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics news: एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गेलेला शिक्षणसम्राट कोण?
एकनाथ शिंदे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांच्यासोबत राज्यातील शिक्षणसम्राट आणि शिवसेनेचा माजी मंत्री उपस्थित होता. मध्यंतरीच्या काळात या नेत्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बिनसले होते. हा नेता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर काहीसा नाराज होता. मात्र, रविवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत या नेत्याने अचानक दिल्ली गाठल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.