कधी IPL वर राज्य केलं, शेवटी लिलावात कुणी विचारलंच नाही; ज्याच्या नावावर प्लेऑफमध्ये सर्वाधिक ध

आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू: आयपीएल 2026 च्या लीग फेरीतील सामने संपले असून आता 26 मेपासून प्लेऑफला सुरुवात होत आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण आहे? जर तुमच्या मनात विराट कोहली किंवा एम एस धोनी यांचं नाव आलं असेल, तर तुम्ही चुकत आहात. चला तर मग जाणून घेऊया, आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज नेमका कोण आहे.

IPL प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण?

आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैना यांच्या नावावर आहे. ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाने आयपीएलच्या इतिहासात 24 प्लेऑफ सामने खेळले असून त्यात 155.21 च्या स्ट्राइक रेटने आणि 37.57 च्या सरासरीने तब्बल 714 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 7 अर्धशतकं झळकावली. रैनाच्या बॅटमधून 51 चौकार आणि 40 षटकार पाहायला मिळाले. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्स या दोन संघांकडून खेळला. त्याच्या संघांनी तब्बल 11 वेळा प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती.

सुरेश रैनाने किती वेळा IPL फायनल खेळली?

सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत चार वेळा अंतिम सामना खेळला आणि विशेष म्हणजे चारही वेळा विजेतेपद पटकावले. चारही फायनलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता.

  • 2010 मध्ये सीएसकेने मुंबई इंडियन्सला हरवत ट्रॉफी जिंकली.
  • 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूवर मात केली.
  • 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादला हरवले.
  • 2021 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत जेतेपद पटकावले.

सुरेश रैनाचे IPL रेकॉर्ड

रैनाने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. सीएसके स्पर्धेत असताना तो कायम त्या संघाचाच भाग राहिला. मात्र 2016 आणि 2017 मध्ये सीएसकेवर बंदी आल्याने तो गुजरात लायन्सकडे गेला होता. रैनाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले असून 136.76 च्या स्ट्राइक रेटने आणि 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या. त्याच्या नावावर 1 शतक आणि 39 अर्धशतकं आहेत. तसेच त्याने 506 चौकार आणि 203 षटकार ठोकले.

IPL 2022 मध्ये घेतला निरोप

आयपीएल 2022 मेगा लिलावात सुरेश रैनाने 2 कोटींच्या बेस प्राईससह नाव नोंदवलं होतं. मात्र कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. त्यानंतर रैनाने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.

IPL प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 फलंदाज

सुरेश रैना – 714 धावा
एमएस धोनी – 523 धावा
शुभमन गिल – 475 धावा
सूर्यकुमार यादव – 406 धावा
रोहित शर्मा – 405 धावा
विराट कोहली – ३९६ धावा
फाफ डू प्लेसिस – 390 धावा

हे ही वाचा –

आयपीएल 2026 प्लेइंग-11 : वैभव-शुभमन इन, रोहित-विराट आऊट…; टीम इंडियाचा माजी स्टार आयपीएल 2026 च्या धोकादायक प्लेइंग-11 ने निवडला, पहा संपूर्ण संघ

आणखी वाचा

Comments are closed.