उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्य सरकारने पहिल्यांदाच उष्णतेच्या लाटेचा इशारा देणारा मेसेज मोबाईलवर प्रसारित केला. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांत उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. प्रत्येकाच्या मोबाईलवर पहिल्यांदाच असे मेसेज आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. काही ठिकाणी रात्रीचे वातावरणही उष्ण राहणार असल्याचे या मेसेजमध्ये नमूद आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या दोन शहरांनी यावेळी तापमानाचा उच्चांक गाठला. ब्रम्हपुरी शहरात तर तापमान 47.6 अंशांवर गेले, तर चंद्रपूर शहरही 46.4 अंशांपलीकडे नोंदवले गेले. या तापमानाने संपूर्ण विदर्भच होरपळून निघत आहे. दरम्यान, आज चंद्रपुरात ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Comments are closed.