Ratnagiri News – मासेमारी नौकेतून डिझेलची तस्करी, ५५०० लीटर डिझेलसह बोट ताब्यात
मासेमारी नौकेचा वापर करून होणाऱ्या डिझेल तस्करीचा पर्दाफाश सीमा शुल्क विभागाने केला आहे. आज पहाटे पडवे येथे सीमा शुल्क विभागाने कारवाई करत डिझेल तस्करी करणारी नौका पकडली. या नौकेत ५५०० लीटर डिझेल सापडले आहे.
तस्करी केलेल्या डिझेलची वाहतूक सुरू असल्याची खबर सीमा शुल्क विभागाला लागली होती. त्यांनी जयगड खाडीच्या परिसरात उत्तर व दक्षिण अशा दोन्ही दिशेला गस्त सुरू ठेवली. आज पहाटे पडवे येथे सीमा शुल्क विभागाने एक मासेमारी नौका पकडली. त्या नौकेतील ड्रममध्ये ५५०० लीटर डिझेल आढळून आले आहे. हे डिझेल खोल समुद्रात एका बार्ज किंवा टग नौकेतून मिळविण्यात आल्याचा अंदाज सीमा शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.
Comments are closed.