मुंबईत VIP कल्चरवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; गाडीवर लाल-निळे दिवे, विधानभवन लोगो लावणाऱ्या

मुंबई क्राईम न्यूज: मुंबई शहरात सर्वसामान्य नागरिकांकडून गाडीवर आमदार किंवा खासदारांच्या नावाचे स्टिकर्स, विधानभवनाचा लोगो आणि लाल-निळ्या दिव्यांचा (Red and Blue Lights) सर्रास गैरवापर होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) शहरातील ‘व्हीआयपी कल्चर’ (VIP Culture) मुळापासून मोडून काढण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत अंधेरी येथील सहार वाहतूक विभागाच्या पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तोतयागिरी करणाऱ्या कपडा व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

Mumbai Crime News: कपडा व्यापाऱ्याची ‘व्हीआयपी’ गिरी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील सहार वाहतूक विभागाच्या हद्दीत पोलिसांनी एका संशयास्पद आलिशान कारला रोखले. या कारवर चक्क महाराष्ट्र विधानमंडळाचा अधिकृत लोगो (Legislature Logo) लावण्यात आला होता, तसेच गाडीमध्ये लाल आणि निळ्या रंगाचे एलईडी लाईट्स (LED Lights) बसवण्यात आले होते. पोलिसांनी जेव्हा या गाडीची सखोल चौकशी केली, तेव्हा ती गाडी कोणत्याही लोकप्रतिनिधीची नसून एका कपडा व्यापाऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai Crime News: लोगो काढला अन् ठोठावला दंड

सहार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या कारमधील विधानभवनाचा लोगो आणि अनधिकृतपणे लावलेले लाल-निळे एलईडी लाईट्स जप्त केले. यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी वाहन चालकावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai Crime News: मुंबईभर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

केंद्र सरकारने 2017 मध्येच सर्वसामान्य आणि प्रशासकीय पातळीवरील गाड्यांवर लाल-निळे दिवे वापरण्यावर म्हणजेच व्हीआयपी संस्कृतीवर कायदेशीर बंदी (Legal Ban) घातली आहे. तरीही अनेक सर्वसामान्य नागरिक आमदार-खासदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली अशा प्रकारची चिन्हे वापरून मुंबईच्या रस्त्यांवर गाड्या फिरवत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसली आहे. मुंबई शहरात अशा प्रकारे अनधिकृतपणे लोगो, स्टिकर्स किंवा दिवे लावून फिरणाऱ्या प्रत्येक वाहनाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Onion Farmers Protest: कांद्याच्या दरावरून चांदवडमध्ये आंदोलन पेटलं, रोहित पवार, दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांनी गाडीची हवा सोडली, टायरची जाळपोळ

Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी

आणखी वाचा

Comments are closed.