धक्कादायक! टीम इंडियाविरुद्ध मालिकेसाठी अफगाणिस्तानची घोषणा; सर्वात मोठा मॅचविनर कसोटीतून गायब
अफगाणिस्तानने भारत मालिकेसाठी कसोटी-एकदिवसीय संघ जाहीर केला : भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीत सर्वांत मोठी बातमी म्हणजे स्टार फिरकीपटू रशीद खानला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. रशीद खानने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी केल्याने त्याच्या शरीराला दुखापत होण्याचा धोका असतो. हीच बाब लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याला एकमेव कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. मात्र, मर्यादित षटकांच्या (वनडे) मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या दौऱ्यावर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व दोन्ही फॉरमॅटमध्ये हश्मतुल्लाह शाहिदीकडेच राहणार आहे.
2027 च्या विश्वचषकावर नजर
अफगाणिस्तानच्या वनडे संघात त्यांचे प्रमुख खेळाडू कायम आहेत. 2027 च्या विश्वचषकाचे दीर्घकालीन नियोजन लक्षात ठेवूनच व्यवस्थापनाने हा संघ निवडल्याचे दिसत आहे. फलंदाजीत मोहम्मद नबी, रहमत शाह आणि रहमानउल्ला गुरबाज हे फलंदाजीचे मुख्य स्तंभ असतील. त्यांच्या सोबतीला सिद्दीकुल्लाह अटल, दरविश रसूली आणि अझमतुल्ला ओमरझाई यांना संधी देण्यात आली आहे.
🚨 अफगाणिस्तान संघ बाहेर आहेत 🚨
6-20 जूनपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तानचे संघ येथे आहेत. 🏏
आमच्या लाइनअपसह आनंदी आहात? #अफगाण अटलान | #INDvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Ut7cgJdEFN
— अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (@ACBofficials) 26 मे 2026
तर गोलंदाजीत अफगाणिस्तानने त्यांच्या बलस्थानावर म्हणजेच फिरकी गोलंदाजीवर विश्वास कायम ठेवला आहे. वनडे मालिकेत रशीद खानवर फिरकीची मुख्य जबाबदारी असेल. त्याच्या जोडीला अल्लाह गझनफर, नांग्याल खरोटी, कैस अहमद आणि शराफुद्दीन अश्रफ हे फिरकीचे पर्याय उपलब्ध असतील.
कसोटी संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा मेळ
भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघात अब्दुल मलिक, रहमानउल्ला झाद्रान आणि अफसर झाझई यांचा समावेश करण्यात आला आहे. रशीद खानच्या अनुपस्थितीत कैस अहमद आणि शराफुद्दीन अश्रफ फिरकीची धुरा सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीची धुरा बिलाल सामी, झिया शरीफी आणि सलीम सफी यांच्या खांद्यावर असेल.
अफगाणिस्तानचा कसोटी संघ (Afghanistan Test squad vs India)
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, रहमानउल्ला गुरबाज, रहमानउल्ला झद्रान, अफसर झझाई, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगयाल खरोताई, कैस अहमद बिलाल सामी, झिया शरीफी, सलीम साफी.
अफगाणिस्तानचा वन डे संघ (Afghanistan ODI squad vs India)
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, रहमत शाह, इकराम अलीखिल, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, नांगयाल खरोताई, अल्लाह गझनफर, झिया रहमान शरीफी, फरीद मलिक, बिलाल साउली.
भारताचा कसोटी संघ (Team India Test squad vs Afghanistan)
शुभमन गिल (कर्नाधर), के.एल. राहुल (समर्थक), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुथार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
भारताचा वन डे संघ (Team India ODI squad vs Afghanistan)
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान मालिकेचे नवे वेळापत्रक (जून 2026)
- 6 ते 10 जून 2026, न्यू चंदीगड (मुल्लानपूर), एकमेव कसोटी
- पहिली वनडे : 13 जून 2026, धरमशाला
- दुसरा वनडे : 17 जून 2026, लखनऊ
- तिसरा वनडे : 20 जून 2026, चेन्नई
Comments are closed.