सूर्यकुमार यादवचे दिवस फिरले? युगांडाविरुद्ध टी-20 सामना खेळण्याची शक्यता

आयपीएलचा हा हंगाम सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav and Mumbai Indians) आणि मुंबई इंडियन्स या दोघांसाठीही निराशाजनक ठरला. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya under captaincy) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची टीम साखळी फेरीतूनच बाहेर पडली. अशातच, आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की, सूर्यकुमार यादव 30 मे रोजी युगांडाविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो.

युगांडाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळणार आहेत. हे सामने युगांडाची टीम भारतीय राष्ट्रीय संघाविरुद्ध नाही, तर ‘टी-20 मुंबई लीग’मधील स्थानिक संघांविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमार यादव ‘ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट’ या टीमकडून टी-20 मुंबई लीगमध्ये खेळतो. 30 मे रोजी युगांडा आणि ट्रायम्फ नाइट्स यांच्यात सामना होणार असून, त्यात सूर्या खेळण्याची शक्यता ‘स्पोर्टस्टार’च्या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.

1 जूनपासून टी-20 मुंबई लीग सुरू होत आहे, त्यामुळे या सामन्याचा उपयोग खेळाडूंना सरावासाठीही होणार आहे. आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही, तरीही त्यांना मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही सांभाळावे लागले होते. टी-20 मुंबई लीगच्या टीमकडून युगांडाविरुद्ध खेळणे ही तशी सामान्य गोष्ट वाटत असली, तरी भारतीय टी-20 टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूने अशा सामन्यात खेळणे नक्कीच चर्चेचा विषय आहे. सध्या सूर्याचा फॉर्म खराब असल्याने, या सामन्यात आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 मुंबई लीगमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments are closed.