Ratnagiri News – कर्ला येथे आगीत घर जळून खाक, दोन लाखांच्या रोख रकमेसह लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंबेशेत कर्ला परिसरात मंगळवारी सकाळी एका बंद घराला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या भीषण आगीत घरातील संपूर्ण सामान, दागिने आणि दोन लाखांची रोकड जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
च्या
आंबेशेत येथील संबंधित कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे मंगळवार सकाळी आपल्या कामासाठी घराबाहेर पडले होते. घर बंद असताना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीने वेढले.
च्या
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घर बाहेरून कुलूपबंद असल्याने सुरुवातीला आग विझवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिकांनी वेळ न घालवता घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. नागरिकांनी घरातील गॅस सिलेंडर तातडीने सुरक्षितरित्या बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Comments are closed.