NEET-UG paper leak case – मनीषा हवालदारचा ‘गॉड’ सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातून आवळल्या मुसक्या, लातूरच्या डॉक्टरलाही बेड्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पेपर फूट प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी मोठी कारवाई केली. सीबीआयने महाराष्ट्रातून आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये लातूर येथील एक डॉक्टर आणि पुण्याच्या एका नामांकित कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्याचा समावेश आहे. या अटकेमुळे नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या 13 झाली आहे.

मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील ‘गॉड’ नावाचा क्रमांक विद्यार्थ्याचा, फॉरेन्सिक तपासातून माहिती उघड,

Comments are closed.