वर्सोवा-दहिसर एलिव्हेटेड मार्गात एक हजार झाडांवर कुऱ्हाड, वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

वर्सोवा-दहिसर एलिव्हेटेड मार्गामुळे मुंबईची वाहतूक कोंडीफोण्यास मोठी मदत होणार असली तरी या मार्गासाठी तब्बल एक हजार झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकणात मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. झाडांच्या बदल्यात 19 हजार 573 झाडांचे पुनर्रोपण पनवेलमध्ये करण्यात येणार आहे.

वर्सोवा-दहिसर मार्गाची कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. यामध्ये वर्सोवा इंटरचेंज ते गोरेगावच्या बंगूर नगर दरम्यान रस्त्यात येणारी 184 झाडे तोडण्यात येणार असून 164 झाडांचे पुनर्रोपण (ट्रान्सप्लांटेशन) करण्यात येणार आहे. यारी रोड बोगदा परिसरातील झाडांच्या पुनर्रोपणाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याच्या बदल्यात 3,795 नवीन झाडांचे पुनर्रोपण मुंबईबाहेर करण्यात येणार आहे. तर बंगूर नगर ते मालाड मायंडस्पेस या टप्प्यात 236 झाडे तोडली जाणार असून 393 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. ही झाडे पवई उद्यानात लावली जाणार असून पनवेल  परिसरात 6,107 झाडे लावण्यात येणार आहेत. मालाड मायंडस्पेस परिसरातील एमडीपी रोड या उपनगरातील महत्त्वाच्या मार्गावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. येथे एकूण 815 झाडे बाधित होणार असून त्यापैकी 118 झाडे तोडली जाणार आहेत, तर 697 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर पनवेल परिसरात 6,805 झाडे लावण्यात येणार आहेत.

– मायंडस्पेस ते चारकोप टप्प्यात 47 झाडे तोडण्यात येणार असून त्या बदल्यात 575 झाडे लावली जातील. तर गोराई इंटरचेंज ते दहिसर मार्गावर 80 झाडे तोडली जाणार असून 102 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या झाडांच्या बदल्यात 2,292 झाडे पनवेलमध्ये लावण्याचा प्रस्ताव आहे. गोराई इंटरचेंजसाठी स्वतंत्रपणे 140 झाडे तोडण्याचा आणि 8 झाडांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी 1,197 झाडे लावली जाणार आहेत.

असे आहे नियोजन

– प्रस्तावित झाडे कापणार आणि वृक्ष लागवड करणार

– एकूण तोडली जाणारी झाडे

– सुमारे 1,000

– एकूण वृक्षलागवड – 19,573

 लागवडीचे ठिकाण – पनवेल, रायगड

 झाडांचे पुनर्रोपण ठिकाण – पवई उद्यान

Comments are closed.