RR vs SRH: एलिमिनेटरमध्ये वैभव सूर्यवंशीचा विक्रमांचा महापूर! एकाच IPL हंगामात सर्वाधिक षटकारासह 'या' रेकॉर्ड्ची केली नोंद

आयपीएल 2026 मध्ये बुधवारी (27 मे) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला गेला. यामध्ये एसआरएचला वैभव सूर्यवंशीच्या वादळाने झोडपले आणि त्यांना स्पर्धेबाहेर केले. मुल्लाणपूरमध्ये खेळला गेलेला हा सामना आरआरने 47 धावांनी जिंकला. यामध्ये वैभवने 97 धावांची जबरदस्त खेळी करत अनेक विक्रमांची नोंद केली आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकल्याचे लगेच लक्षात आले, कारण वैभवने त्याला आरआरच्या डावाच्या पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर हा 15 वर्षीय फलंदाजी काही थांबला नाही. त्याने एसआरएचच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 20 चेंडूंतच 60 धावा केल्या. त्याचा हा थरार 9व्या षटकात संपला. प्रफुल हिंगेने त्याला बाद केले. तोपर्यंत त्याने संघाला चांगली धावसंख्या उभारण्याचा भक्कम पाया रचला आणि त्याचबरोबर खालील विक्रम मोडले, रचले.

एलिमिनेटर सामन्यात वैभवचे काही विक्रम-
1) टी20 स्पर्धेत 600 धावा करणारा आतापर्यंतचा पहिलाच किशोरवयीन खेळाडू.
2) एका आयपीएल हंगामात अनकॅप्ड खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा – 680 धावा.
3) 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून, आयपीएल प्ले-ऑफमधील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी. सुरेश रैनाने 2014 मध्ये किंग्ज इलेवन पंजाबविरुद्ध 16 चेंडूतच अर्धशतक केले होते.

4) एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार – 65 षटकार.
5) टी 20 स्पर्धा किंवा मालिकेत आतापर्यंतचे सर्वाधिक षटकार.
6) आयपीएल प्ले-ऑफच्या एका डावात सर्वाधिक षटकार – 12 षटकार.
7) एकाच आयपीएल हंगामात, तीन वेळा 10 किंवा 10+ षटकार मारणारा पहिला खेळाडू. त्याचबरोबर वैभवने आयपीएलच्या चार डावांमध्ये 10 किंवा 10+ षटकार मारण्याच्या, ख्रिस गेलच्या सर्वकालीन विक्रमाशी बरोबरी केली.
8) एकाच आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा – 490 धावा.
9) आयपीएल पॉवरप्लेच्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार – पहिल्या सहा षटकांत 8 षटकार.

Comments are closed.