अमेरिकेत विमानच हायजॅकचा कट? प्रवाशाचा कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, विमानाचे आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत शिकागोहून मिनियापोलिसला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानात धक्कादायक घटना घडली. एका प्रवाशाने वारंवार विमानातील कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे वैमिनिकाने 7500 आपत्कालीन ट्रान्सपॉन्डर कोड सक्रिय केला. यानंतर विमानाचे विस्कॉन्सिनमधील मॅडिसन विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान मॅडिसन विमानतळावर उतरताच स्थानिक पोलीस आणि केंद्रीय एजन्सीच्या पथकाने प्रवाशाला अटक केली.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बोईंग 737 विमान शुक्रवारी रात्री शिकागोच्या ओ’हेर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मिनियापोलिसला निघाले होते. विमानात 147 प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. प्रवासादरम्यान एका प्रवाशाने वारंवार विमानाच्या कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अखेर वैमानिकाने एटीसीला माहिती देत 7500 आपत्कालीन ट्रान्सपॉन्डर कोड सक्रिय केला.

आपत्कालीन कोड सक्रिय केल्यानंतर विमान मॅडिसनमधील डेन काउंटी प्रादेशिक विमानतळावर वळवण्यात आले. विमानतळावर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय एजन्सींचे एक पथक आधीच उपस्थित होते. प्रवाशाला ताब्यात घेतल्यानंतर विमानाला पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.

Comments are closed.