Intimate Hygiene : पावसाळ्यात महिलांनी इंटिमेट हायजिन कसे राखावे?

पावसाळा कितीही हवाहवासा वाटला तरी अंगावरचे कपडे भिजल्यावर नकोसा वाटतो. पावसामुळे केवळ कपडेच ओले होत नाही तर इनरवेअर सुद्धा ओले होतात. वर्किंग महिलांसाठी तर या दिवसात ओल्या इनरवेअर घेऊन दिवसभर राहणं सर्वात मोठी समस्या असते. ओल्या इनरवेअरमुळे प्रायव्हेट भागात अनेक प्रकारचे संसर्ग, ऍलर्जी होण्याची शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने पुरळ उठणे, खाज येणे अशा समस्या उदभवतात. आजच्या लेखात या समस्या टाळण्यासाठी पावसाळ्यात इंटिमेट हायजिन कसे राखायचे यासंदर्भातील टिप्स जाणून घेऊयात,

अंतरंग स्वच्छता टिपा –

कॉटन हे कापड त्वचा ड्राय ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कॉटनच्या अंडरवेअरमुळे ओलाव्यामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी असतो.

पावसाळाच नव्हे तर वर्षाचे बाराही महिने अंडरवेअर सॉफ्ट डिटर्जंटने धुवायला हवेत. यामुळे तुम्हाला संसर्गाचा धोका कमी होतो.

हेही वाचा – Women’s Health Tips : व्हाइट डिस्चार्जची समस्या वाढतेय? हे संकेत दुर्लक्षित करू नका!

एक्सरसाइज करताना वापरण्यात आलेले इनरवेअर लगेचच बदलावी. त्याच इनरवेअरवर दिवसभर राहू नये. कारण घामामुळे प्रायव्हेट भागात बॅक्टरीया जमा होऊन संसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात कायम लवकर सुकतील असेच कपडे परिधान करावेत. अतिशय घट्ट कपडे आणि अंडरवेअर चुकूनही घालू नयेत.

पावसाळ्यात पिरीएड्समध्ये सॅनिटरी पॅडऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरावा. आरोग्याच्या दृष्टीने मेन्स्ट्रुअल कप बेस्ट असतोच शिवाय तुम्ही चुकून पावसात भिजलात तर अशा परिस्थितीत डाग लागण्याची समस्या जाणवणार नाही.

महिलांनी पावसाळ्यात बाहेरून घरी आल्यावर हाता – पायांसह इंटिमेट हायजिनमध्ये प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करावी. यासाठी तुम्ही सॉफ्ट साबण आणि कोमट पाण्याचा वापर करायला हवा.

हेही वाचा – Working Moms Stress : वर्किंग मॉम्समध्ये वाढतोय ‘गिल्ट स्ट्रेस’

Comments are closed.