गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटीस्टँडमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. ८७ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर आली आहे. स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये (Dattatray Gade Swargate case) तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपीवर दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडेने तरुणीवर अत्याचार (Dattatray Gade Swargate case) केला होता. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याप्रकरणात एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला होणार आहे.(Dattatray Gade Swargate case)
Dattatray Gade Swargate case: अत्याचारानंतर गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चिती करण्यात आली असून, विशेष सरकारी वकिलांकडून सोमवारी (दि. १) ८७ साक्षीदारांसह आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी दि. १५ जून रोजी होणार आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने एका तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे (Dattatray Gade Swargate case) घटनास्थळावरून फरार झाला होता. तो आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. (Dattatray Gade Swargate case)
न्यायालयाने सुरूवातीला त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदने या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. या पंचनाम्यांमधून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. घटनेला वर्ष उलटल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.