लाज वाटली पाहिजे! भाजप सरकारने CBSE चे चेअरमन, सचिवांची बदली केली, धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा; आदित्य ठाकरे संतापले
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि करिअर उद्ध्वस्त करणाऱ्या घटनांनंतर, केवळ सीबीएसईच्या (CBSE) चेअरमन आणि सचिवांची बदली करून कारवाईचा देखावा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “लाज वाटली पाहिजे”, अशा तीव्र शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्र सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, “असे दिसतेय की, सीबीएईचे चेअरमन आणि सचिव यांची केवळ बदली करणे ही भाजप सरकारची मोठी कारवाई आहे. ही लाजिरवाणी बाब. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तत्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.”
या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना ठाकरे पुढे म्हणाले, “या चेअरमन आणि सचिवांना निलंबित करून त्यांच्या कृत्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांची केवळ दुसरीकडे बदली करणे, हा अन्याय आहे.”
त्यामुळे CBSE चेअरमन आणि सेक्रेटरी यांची बदली करणे ही भाजप सरकारची “मोठी कारवाई” आहे.
किती लाज वाटते!
लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे करिअर उद्ध्वस्त करणाऱ्या शिक्षणमंत्री प्रधान यांची हकालपट्टी झालीच पाहिजे!
आणि या अध्यक्ष आणि सचिवांना निलंबित करून चौकशी करण्यात यावी…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 2 जून 2026
Comments are closed.