अमेरिकेमध्ये 30 हिंदुस्थानी ट्रक चालकांवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहून व्यावसायिक ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या सुमारे 30 हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना मायदेशात पाठवण्यात येणार आहे. ही कारवाई 11 ते 15 मेदरम्यान राबवलेल्या ‘ऑपरेशन चेकमेट’चा भाग होती. अ‍ॅरिझोनामधील युमा सेक्टरमध्ये अमेरिकन बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी ही मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या 52 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये सेमी-ट्रक चालवणाऱ्या 36 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.