Ratnagiri News – जिल्ह्यात हातभट्यांवर धडक मोहिम, 30 जणांना अटक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे जिल्ह्यात हातभट्टीतील विषारी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात हातभट्टी दारूचे उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहिम राबवली. त्यामध्ये 38 गुन्हे दाखल करण्यात आले असून 30 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत हातभट्टीची दारू, गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 1 हजार 640 हातभट्टीची गावठी दारू, गोवा बनावटीची 17.64 बल्क लीटर विदेशी दारू, हातभट्टीसाठी वापरले जाणारे 23 हजार 400 लीटर रसायन आणि दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले एक वाहन असा 11 लाख 66 हजार 05 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कुठे हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री सुरू असल्यास, दारूची वाहतूक सुरू असल्यास आणि बनावट माडी विक्री सुरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोबाईल क्र. 8422001133 आणि टोल फ्री क्रमांक 18002339999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Comments are closed.