महागाईविरोधात शिवसेनेची धडक; सलग दुसऱ्या मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन
भयंकर वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळून जात असताना ढिम्म सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ही स्थिती ओढावली आहेत. इंधन तुटवडय़ामुळे सर्वच महागाई वाढली आहे. त्यामुळे गाढ झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेकडून आज मुंबईभरात अनेक ठिकाणी आंदोलन करून निषेध करण्यात आला.
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून शिवसेना शाखा क्र. 191 आश्रय हॉटेलपासून शिवसेना भवनपर्यंत शिवसेना विभाग क्रमांक 10 च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. लोकांनी तीन तीनदा निवडून दिल्यानंतरदेखील सामान्य जनतेच्या पाठीत खंबीर खुपसण्याचे काम या केंद्र आणि राज्य शासनाने केल्याचा आरोप विभागप्रमुख आमदार महेश सावंत यांनी केला. यावेळी विभाग संघटक नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, माहीम महिला विधानसभा संघटक आरती किनरे, वडाळा महिला विधानसभा संघटक सुनिता अहिरे, व शाखेतील सर्व महिला पुरुष शाखाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.