‘खरात सोबत माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एकाची दोन्ही पदं गेली, दुसऱ्याच्या घरात तिसरं पद आ

सुनील तटकरेंवर रोहित पवार : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा (Resignation) दिला होता. तर कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची कोकण विधान परिषदेतून बिनविरोध निवड झालीय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत तटकरेंवर निशाणा साधलाय.

Rohit Pawar on Sunil Tatkare: खरात प्रकरणात एकालाच टार्गेट केल्याचा रोहित पवारांचा दावा

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांसह राष्ट्रवादीतीलच एका गटाने दबाव टाकल्यामुळे त्यांनी आधी महिला आयोग आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, रोहित पवार यांनी यामागे मोठा ‘पॉलिटिकल गेम’ (Political Game) असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्तेतील तिन्ही घटक पक्षांतील नेत्यांचा या खरात प्रकरणात थेट संबंध आहे. परंतु, तरीही आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आले.

Rohit Pawar on Sunil Tatkare: रुपाली चाकणकरांचा खरात सोबत गुवाहाटी दौरा

रुपाली चाकणकर या अशोक खरातला आपला गुरू मानायच्या आणि खरातच्या सांगण्यावरून त्यांनी काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप केल्याचेही समोर आले होते. तसेच 2021 मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केला होता; ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याच गुवाहाटी दौऱ्याचा संदर्भ देत रोहित पवारांनी सुनील तटकरे यांच्याकडे बोट दाखवले आहे.

Rohit Pawar on Sunil Tatkare: नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम,” असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Vidhan Parishad Election 2026: माघार नाट्यावर एका दिवसांत 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.