श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्…; काय असणार पहिलं
श्रेयस अय्यर बातम्या: भारतीय क्रिकेटमध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे भारतीय पुरुष टी-20 संघाचे नेतृत्व सोपवले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ स्तरावरील बैठकीनंतर हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी श्रेयस अय्यरला आगामी मालिकांसाठी संघाचा नवा कर्णधार बनवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
निवड समितीच्या बैठकीतही श्रेयसचा सहभाग (Shreyas Iyer News)
विशेष म्हणजे, आगामी दौऱ्यांसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत श्रेयस अय्यर सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यापूर्वी निवड प्रक्रियेत सहभागी करून घेणे, हे संघाच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
उपकर्णधारपदाच्या शर्यतीत टिळक वर्मा आघाडीवर (टिळक वर्मा न्यूज)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या चर्चेनंतर युवा फलंदाज तिलक वर्मा याला संघाचा उपकर्णधार बनवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय टी-20 संघाच्या नेतृत्वात मोठी पिढीबदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
आयपीएल 2026 मधील दमदार कामगिरी ठरली टर्निंग पॉइंट (Shreyas Iyer IPL 2026 News)
श्रेयस अय्यरसाठी हा प्रवास अत्यंत नाट्यमय राहिला आहे. डिसेंबर 2023 नंतर तो भारतीय टी-20 संघाबाहेर होता. मात्र, आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने 498 धावा करत शानदार कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वगुणांसह सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे निवडकर्त्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्यात तो यशस्वी ठरला. याच कामगिरीच्या जोरावर त्याची संघात पुनरागमनाची दारे उघडली आणि आता थेट कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद जाणार? (Will Suryakumar Yadav lose the captaincy?)
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्याची चर्चा अनेकांसाठी धक्कादायक ठरत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. मात्र, स्पर्धेदरम्यान त्याची वैयक्तिक फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने 9 सामन्यांत 242 धावा केल्या. यानंतर आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याच्या बॅटमधून केवळ 270 धावा आल्या आणि संघालाही निराशाजनक नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे 2028 च्या टी-20 विश्वचषकाचा दीर्घकालीन विचार करून निवडकर्ते नव्या नेतृत्वावर भर देत असल्याचे मानले जात आहे.
श्रेयसमोरेने पहिले टार्गेट घेतले? (श्रेयस अय्यर न्यूज)
जर श्रेयस अय्यरला अधिकृतपणे कर्णधारपद मिळाले, तर त्याची पहिली मोठी परीक्षा 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत असेल. या दौऱ्यात भारताला दोन टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असून तेथे पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. नव्या कर्णधार म्हणून श्रेयससमोर संघात स्थिरता आणणे, युवा खेळाडूंना संधी देणे आणि 2028 विश्वचषकासाठी मजबूत संघबांधणी करणे हेच सर्वात मोठे लक्ष्य असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.