राजगड तालुक्यातही वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा, दहशत माजवण्याचा प्रयत्न
गुन्हे बातम्या ठेवा: पुणे शहरानंतर आता ग्रामीण भागात देखील गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. पुण्यातील राजगड तालुक्यात तलवार हातात घेत गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. गाड्यांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी राजगड तालुक्यात एका गावात मध्यरात्री राडा घातला आहे.
हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या गाड्यांची आरोपींकडून तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तींनी हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हातात तलवारी घेऊन गाड्यांची तडफोड केली आहे. यामुळं परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
चारचाकी गाडी पार्किंग करण्यावरुन वाद, दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार
चारचाकी गाडी पार्किंग करताना झालेल्या वादातून दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार झाला आहे. यातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य दोन आरोपी ऊसात पळून गेले त्यांचा पोलिसांकडून ऊसात त्यांचा शोध घेतला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तूलमधून 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी घटना स्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार,पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.