सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा
राज्यसभा निवडणूक 2026 छगन भुजबळ: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेची जागा भाजपकडे (BJP) जाणार असल्याची जोरदार चर्चा कालपासून रंगली आहे. या जागेवरुन भाजप आक्रमक वक्तृत्वशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना संधी देईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Rajya Sabha Election 2026)
यावेळी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी कशी महत्त्वाची आहे, हे सांगितले. या जागेवरुन छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे, ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणाव लागेल, किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे, असा संदेश जाईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याबाबतही कडवट आवाहन केले. असं करायचं नसेल तर राज्यसभेवर छगन भुजबळ साहेबांना संधी द्या. छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी दिली तर आम्ही त्याचे स्वागत करु. हा आमचा विषय नाही. परंतु भाजपप्रेरित व्यक्तीला राज्यसभेच्या या जागेवरुन उमेदवारी दिली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला शरण गेला, असे म्हटले जाईल, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रोहित पवार यांनी पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवळी माघार घेतल्याच्या मुद्द्याबाबतही भाष्य केले. आमच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, हे चूक आहे. पण तो चांगला आणि प्रामाणिक आहे. पैशाचा आकडा जो फुटत आहे, फॉर्म घेण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला 50 – 60 कोटी मोजावे लागत असतील, निवडून येण्यासाठी 50 कोटी तो आकडा बघून महाविकास आघाडीचे उमेदवार कचरले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक ही ठराविक लोकांची निवडणूक झाली आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
सोलापूर विधानपरिषद निवडणूक! 616 पैकी मला 550 मतं मिळतील, राजेंद्र राऊतांनी व्यक्त केला विश्वास
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Comments are closed.