वाशीमध्ये बेकायदा फुटबॉल टर्फवर सिडकोचा हातोडा
वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये ठेकेदाराने तयार केलेल्या बेकायदा फुटबॉल टर्फवर सिडकोने आज बुलडोझर चालवला. हा टर्फ पार्किंगच्या जागेत तयार करण्यात आला होता. तो हटवण्याची नोटीस वसाहत विभागाने ठेकेदाराला दिली होती. मात्र त्यानंतरही टर्फचा वापर सुरूच राहिल्यामुळे सिडकोनेही ही कारवाई केली आहे.
वाशी रेल्वे स्थानक परिसरात असलेले एक्झीबिशन सेंटर सिडकोने एका खासगी कंपनीला चालवण्यासाठी दिले आहे. ठेकेदाराने तिथे फुटबॉल टर्फ तयार करून तो त्रयस्थ व्यक्तीला चालवण्यासाठी दिला होता. त्यासाठी सिडकोची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा टर्फ हटवण्यासाठी सिडकोच्या वसाहत विभागाने ठेकेदाराला नोटीस पाठवली होती. मात्र त्याने स्वतŠहून टर्फ न हटवल्यामुळे आज धडक कारवाई करण्यात आली, असे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.
Comments are closed.