“विधान परिषद निवडणुकीत रंगत नाही, प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून…” सुप्रिया सुळे यांचा मोठे विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही रंगत दिसत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे रंगत नाही. प्रचंड घोडेबाजार सुरू आहे. घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या पुण्यात बोलत होत्या.

भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडण्यास भाग पाडू नये, आम्ही त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने संघर्ष करू, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये आणि पैशाच्या जोरावर कोणीही निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देश लोकशाही मार्गानेच चालला पाहिजे आणि लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक मला फारशी रंगतदार वाटली नाही. खरी रंगत ही लोकसभा, विधानसभा किंवा पालिका निवडणुकांमध्येच पाहायला मिळते, असेही त्या म्हणाल्या.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.