सुनील बर्वे-ऐश्वर्या नारकर वेब सीरिजमध्ये, ‘8 वाजून 13 मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
आयुष्यात काही क्षण असे असतात, जे सगळंच बदलून टाकतात… पण जर त्या एका क्षणासोबत मृत्यूची चाहूल जोडली गेली तर अशाच रहस्य, भावना आणि अनपेक्षित घटनांनी भरलेल्या ‘8 वाजून 13 मिनिटे’ या आगामी मराठी वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवरील ही वेब सीरिज नुकतीच भेटीला आली आहे.
ट्रेलरमध्ये एका साध्या आणि प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱया घटनांमुळे निर्माण झालेला तणाव, नात्यांमध्ये होणारे बदल आणि वाढत जाणारे रहस्य प्रभावीपणे दाखवले आहे. प्रत्येक दृश्यात सस्पेन्ससोबत भावनिक बाजूही जाणवते. त्यामुळे ही सीरिज फक्त रहस्यकथा नसून मानवी भावनांचा वेध घेणारी ठरते. ‘8 वाजून 13 मिनिटे’ या वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकणार असून, त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे. गिरीश मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या वेब सीरिजमध्ये शरद पोंक्षे, उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Comments are closed.