दिल्लीतील महिला प्राध्यापक हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.

1400 किमीवरून हत्येसाठी आले होते दांपत्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पश्चिम बंगालधील एका दांपत्याला अटक केली आहे. या दांपत्याने मालमत्ता वादातून पॉल यांची हत्या केली होती. हे प्रकरण 1400 किलोमीटर अंतरावर पश्चिम बंगालमध्ये असलेली संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे.

प्राध्यापिका देवोस्मात पॉल आणि अटक करण्यात आलेल्या भाडेकरू दांपत्यादरम्यान पश्चिम बंगालमधील एका संपत्तीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. प्राध्यापिका पॉल स्वत:च्या आजोबांच्या संपत्तीमधील भाडेकरूंना हटवू पाहत होत्या. तर आरोपी त्यावर कब्जा करून होते. याच वादातून आरोपींनी पॉल यांना  ठार करण्याचा कट रचला होता. या हत्येसाठी दांपत्य पश्चिम बंगालमधून दिल्लीत पोहोचले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्dयात छापे टाकत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे.

Comments are closed.