आसामच्या विकासासाठी युरोपचा पुढाकार

आसाममध्ये पोहोचणार ईयूचे उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ

टी न्यूज एजन्सी, गुवाहाटी

युरोपीय महासंघाचे उच्चस्तरीय ‘टीम युरोप’ प्रतिनिधिमंडळ 8-9 जून रोजी आसाम दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्याचा उद्देश ईशान्य भारतातील राज्ये आणि युरोपदरम्यान व्यापार, गुंतवणुक आणि आर्थिक सहकार्याला चालना देणे आहे.  कधीकाळी ईशान्य भारताला केवळ भौगोकि आणि राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात होते, परंतु आता चित्र वेगाने बदलले आहे. आसाम आणि पूर्ण ईशान्य आता आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, हरित उद्योग आणि जागतिक भागीदारीचे नवे केंद्र होण्याच्या दि`शेने वाटचाल करत आहे.

युरोपीय महासंघासोबतची ही भागीदारी मजबूत झाल्यास आसाममध्ये रोजगार, पायाभूत सुविधा आणि विदेशी गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. यामुळे स्थानिक उद्योगांनाही मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधिमंडळात युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांचे राजदूत, वरिष्ठ अधिकारी आणि युरोपमधील दिग्गज उद्योजक सामील असतील. तसेच भारत आणि भुतानमधील युरोपीय महासंघाचे राजदूत हर्वे डेल्फिन समवेत युरोपीय सदस्य देशांचे राजदूत आणि वरिष्ठ प्रतिनिधी यात सामील असतील. हे प्रतिनिधिमंडळ आसाम सरकार आणि उद्योगजगताच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेत गुंतवणूक तसेच नव्या संधींचा शोध घेणार आहे.

दौऱ्यादरम्यान नुतनीकरणीय तसेच हरित ऊर्जा, शाश्वत शहरी पायाभूत सुविधा, आरोग्य तसेच औषधनिर्मिती, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, चहा अन् कृषी आधारित प्रक्रिया, फ्लेवर आणि फ्रेगरेंस तसेच आयुष यासारख्या क्षेत्रांमध्sय सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा होणार आहे. युरोपीय उच्चस्तरीय ‘टीम युरोप’चा हा दौरा ईशान्य भारतासाठी मोठ्या आर्थिक संधीच्या स्वरुपात मानला जातोय.

आसाम आणि ईशान्य क्षेत्रातील साधनसामग्री, रणनीतिक स्थिती आणि औद्योगिक शक्यता युरोपीय गुंतवणुकदारांसाठी आकर्षक संधी प्रदान करतात असे ईयूचे मानणे आहे. हा दौरा भारत-युरोपीय महासंघ व्यापक रणनीतिक भागीदारीला मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होताच होणारा हा दौरा आसाम सरकारसाठी मोठी कामगिरी ठरणार आहे.

Comments are closed.