टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घ
श्रेयस अय्यर भारताच्या टी-२० कर्णधाराचे विधान : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची जागा आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने घेतली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अय्यरच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेतृत्वाची धुरा हाती आली असली तरी आपल्या स्वभावात किंवा विचारसरणीत कोणताही बदल करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
“मला माझी व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज वाटत नाही” – श्रेयस अय्यर
नवीन कर्णधार म्हणून आपल्या नेतृत्वशैलीबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “मला माझी व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज वाटत नाही. मी जसा आधी होतो तसाच राहणार आहे. कोणाची नक्कल करणे किंवा कोणाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करणे मला मान्य नाही.” अय्यरच्या मते, यशस्वी नेतृत्वासाठी स्वतःची ओळख जपणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे तो आपल्या नैसर्गिक शैलीत संघाचे नेतृत्व करणार असून खेळाडूंशीही त्याच पद्धतीने संवाद साधणार आहे.
मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीने घडवला अय्यर
मुंबईसारख्या क्रिकेटच्या पंढरीत वाढलेल्या अय्यरने आपल्या यशामागील संघर्षाचाही उल्लेख केला. तो म्हणाला की, “मुंबईत प्रत्येक गल्लीत देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारे अनेक क्रिकेटपटू असतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करत मी इथपर्यंत पोहोचला आहे.” त्यामुळे दबावाच्या परिस्थितीत कसे खेळायचे, संघाला कसे एकत्र ठेवायचे आणि विजयासाठी कशी झुंज द्यायची याचा अनुभव त्याला लहानपणापासूनच मिळाला आहे. त्याचे लक्ष नेहमीच संघाला विजय मिळवून देण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर केंद्रित राहिले आहे.
टी-20 संघात दमदार पुनरागमन
अय्यरसाठी ही कर्णधारपदाची संधी विशेष मानली जात आहे. डिसेंबर 2023 नंतर तो भारतीय टी-20 संघाच्या योजनांमधून जवळपास बाहेर पडला होता. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर त्याने जोरदार पुनरागमन केले. विशेष म्हणजे, संघात पुनरागमन करताच त्याच्याकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे निवड समितीचा त्याच्यावर असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.
आयर्लंडविरुद्ध पहिली मोठी परीक्षा
नवीन कर्णधार म्हणून अय्यरची पहिली कसोटी आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लागणार आहे. या मालिकेत त्याच्या नेतृत्वशैलीकडे आणि निर्णयक्षमतेकडे सर्वांचे लक्ष असेल. संघातील वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये योग्य समन्वय साधत तो भारताला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, माजी भारतीय कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही निवड समितीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. गांगुली म्हणाले, “श्रेयस अय्यरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि तो या संधीचा पात्र आहे. सूर्यकुमार यादवला हटवण्याचा निर्णय चुकीचा नाही. निवडकर्त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.”
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.