भारत-अफगाणिस्तान वनडे मालिका: कसोटीनंतर टीम इंडियाच्या संघात होणार मोठे बदल!

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील एकमेव कसोटी सामना नुकताच पार पडला. शुबमन गिलच्या (Shubman gill’s under captaincy) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सामन्यात एक डाव आणि 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता कसोटीनंतर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, त्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.

बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी स्वतंत्र खेळाडू निवडले होते. 7 खेळाडू फक्त कसोटीसाठी होते, तर 7 नवीन खेळाडू केवळ वनडे मालिकेसाठी निवडले आहेत. 8 खेळाडू मात्र दोन्ही फॉरमॅटमध्ये कायम आहेत. त्यामुळे कसोटी सामना संपताच 7 खेळाडू संघाबाहेर पडतील आणि त्याजागी नवीन खेळाडू येतील.
कसोटीतून बाहेर पडणाऱ्या 7 खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, मानव सुथार आणि ध्रुव जुरेल हे खेळाडू आहेत. तर वनडे संघातून येणारे 7 नवीन खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि प्रिंस यादव हे आहेत.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्माविराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्यानितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

बीसीसीआयने अधिकृतरीत्या काहीही सांगितले नसले, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली (Virat Kohli) ‘हॅमस्ट्रिंग’च्या दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

वनडे मालिकेचे वेळापत्रक:
पहिला वनडे: 13 जून (शनिवार) – धर्मशाला
दुसरा वनडे: 17 जून (बुधवार) – लखनऊ
तिसरा वनडे: 20 जून (शनिवार) – चेन्नई

Comments are closed.