इस्रायली सैनिकांकडून पॅलेस्टिनींवर अत्याचार, बलात्कार, नरकयातना; हिटलरलाही लाजवेल असे अमानवी कृत्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘हमास’ला संपवण्यासाठी गाझापट्टीत घुसलेल्या इस्रायलच्या सैनिकांचा अत्यंत क्रूर आणि भयानक चेहरा जगापुढे आला आहे. ‘हमास’चे हस्तक व संशयित म्हणून पैद करण्यात आलेल्या अनेक पॅलेस्टिनी नागरिकांसोबत इस्रायली सैनिकांनी हिटलरलाही लाजवतील असे अत्याचार केले. शारीरिक, मानसिक छळ आणि बलात्कार करून त्यांना अक्षरशः नरकयातना दिल्या. ‘अल जझीरा’ वृत्तवाहिनीच्या ‘बॉडीज ऑफ इव्हिडन्स ः इस्रायल्स डार्पेस्ट वेपन’ या माहितीपटातून हे भयंकर वास्तव समोर आले आहे.

इस्रायलच्या छळछावणीतून सुटलेल्या काही पैद्यांच्या ‘अल जझीरा’च्या पत्रकारांनी महिनाभर मुलाखती घेतल्या. त्याआधारे हा माहितीपट बनवण्यात आला असून त्यातून थरकाप उडवणारा तपशील समोर आला आहे. ऑक्टोबर 2023च्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्ध पुकारत गाझावर हल्ला केला. कालांतराने संपूर्ण गाझापट्टी ताब्यात घेण्याची घोषणा करत तिथे घुसखोरी केली. चौकशीच्या नावाखाली हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले. तिथूनच इस्रायली सैनिकांच्या अत्याचाराचे सत्र सुरू झाले.

अत्याचारासाठी श्वानांचा वापर

2024 च्या ईदच्या दिवशी गाझातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा इस्रायली सैनिकांनी अतोनात छळ केला. त्याला मारले. बांधले आणि माती खायला लावली. पैद्यांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी इस्रायली सैनिकांनी श्वानांचाही वापर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे ते श्वान पालन करायचे, असे एका पैद्याने सांगितले.

पॅलेस्टाइन सेंटर फॉर ह्युमन राइट्स आणि युरो-मेड ह्युमन राइट्स मॉनिटर यांसारख्या मानवाधिकार संस्थांनी देखील काही पैद्यांचे असे अनुभव नोंदवले आहेत.

छळाचे व्हिडीओ शूट केले!

एका पॅलेस्टिनी नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, खान युनूस येथून त्याला अटक करण्यात आली होती. तो तब्बल 20 महिने इस्रायलच्या ताब्यात होता. या काळात त्याला पाच तुरुंगांतून फिरवण्यात आले. त्याच्यासोबत इतर सात पैदी होते. एक दिवस आम्हा सगळ्यांना एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. हातात बेडय़ा असतानाही आमचे हात पाठीमागे बांधले गेले. पायात बेडय़ा घातल्या गेल्या. डोळ्यांवर पट्टी बांधली गेली. नग्न करून पोटावर झोपवण्यात आले आणि बलात्कार करण्यात आले. आम्ही जिवाच्या आकांताने ओरडत होतो, देवाचा धावा करत होतो. पण ते हसत-खिदळत होते आणि आमचे व्हिडीओ शूट करत होते. 20 ते 25 मिनिटे हे सगळे सुरू होते, असे त्याने सांगितले.

Comments are closed.