लंडनमध्ये 36 व्या मजल्यावरून पडून मुंबईतील तिघे ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लंडनमधील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया तीन मुंबईकरांचा 36 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. राकेश पै (47), अदिती परळकर (46) आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा सिड यांचा फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे. सिड असाध्य आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर पुढील उपचार करण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

प्रसिद्ध अंकल टॉवरमधील 36 व्या मजल्यावर हे लोक राहत होते. या सर्वांचा पडून मृत्यू झाला नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र या कुटुंबाच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांनी आत्महत्येची शक्यता फेटाळून लावली आहे. पै आणि परळकर हे 2000 साली मुंबईहून लंडनला आले होते.

Comments are closed.