US Iran Attacks कुवेतने आपली हवाई हद्द केली बंद, अमेरिकी तळांवर इराणच्या हल्ल्यांमुळे घेतला निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखातात पुन्हा एकदा तणाव वाढला असून सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इराणने एकमेकांना लक्ष्य केले आहे. इराण आखातातील अमेरिकाच्या तळांना लक्ष्य करत आहे. यामुळे कुवेतने गुरुवारी जाहीर केले की, इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे.

कुवेतच्या ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ने ही घोषणा केली. कोणताही सविस्तर तपशील न देता त्यांनी सांगितले की, विमानांचे मार्ग बदलून ती इतर विमानतळांकडे वळवली जात आहेत. लष्कराने आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करत प्रतिहल्ले करत असल्याचे जाहीर केले. या घोषणेपूर्वी काही काळ विमाने कुवेतच्या बाहेरील आकाशात घिरट्या घालत होती.

‘कुवेतमधील अमेरिकी तळांवर होत असलेली इराणची आक्रमणे आणि यामुळे या भागातील नागरी विमान वाहतुकीवर ओढवू शकणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे’, असे कुवेतने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणचा थेट हल्ला झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून डझनावारी लोक जखमी झाले आहेत.

Comments are closed.