ब्रेकिंग! दिल्लीत जन्मलेल्या फिरकीपटूचा ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात समावेश, बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी झाली निवड
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने गुरूवारी (११ जून) संघ जाहीर केला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने दिल्लीत जन्मलेल्या फिरकीपटूचा संघात समावेश केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निखिल चौधरीची निवड करण्यात आली आहे.
निखिल अजून ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला नाही, मात्र या ३० वर्षीय खेळाडूने होबार्ट हरिकेन्सकडून बिग बॅश टी२० स्पर्धेत खेळून देशांतर्गत स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचाही भाग राहिला आहे. तो ६० हून अधिक वर्षांत ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा ‘भारतात जन्मलेला’ पहिला पुरुष खेळाडू ठरू शकतो.
दशकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यापूर्वी दिल्लीत जन्मलेले चौधरी, जर १७ जून रोजी चट्टोग्राममध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी निवडले गेले, तर ते ६० वर्षांहून अधिक काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे भारतात जन्मलेले पहिले ऑस्ट्रेलियन पुरुष खेळाडू ठरू शकतात.
ऑस्ट्रेलिया संघ- मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, निखिल चौधरी, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, जोएल डेव्हिस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनेमन, रायली मेरेडिथ, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, ॲडम झाम्पा
Comments are closed.