शिवराज्याभिषेक दिनी पुण्यात पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत

पुणे रेव्ह पार्टीवर राष्ट्रवादीचे शरद पवार पुण्यातील तुळापूर येथील रेव्ह पार्टी प्रकरणी (Pune Rave Party) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात पार्टीची परवानगी दिलीच कशी ? असा जाब विचारला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून सविस्तर माहिती दिली आहे.

खडसे म्हणाल्या की, रेव्ह पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभागानेच परवानगी दिली होती. हा किती करंटेपणा आहे? छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे रक्षण करत ज्या तुळापुरात आपला देह ठेवला, त्यांची पवित्र स्मृती तिथे आहे‌. अशा पवित्र ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देतेच कसं ? कहर म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन असतो, आनंदाचा सोहळा असतो त्याच दिवशी ही मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देण्यात आली आहे असे सांगत असतानाच हे शासन छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असते मग आता तुमचं हिंदुत्व कुठे गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Rohini Khadse on Pune Rave Party: पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण?

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व शिव-शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिवराज्याभिषेक दिनी पवित्र अशा तुळापूरात या पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? याची चौकशी विभागाने करावी व त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस रोहित पवार, पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Rohini Khadse on Pune Rave Party: फक्त 29 लोकांचीच का टेस्ट करण्यात आली?

दरम्यान, रोहिणी खडसे यांनी यांनी याआधीही या प्रकरणावरून पुणे पोलिसांवर निशाणा साधला होता. रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार-पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’चं नाव दिले होते. आता 156 लोक सापडली त्याला ‘हाऊस पार्टी’ म्हणत आहेत. प्रांजल यांच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते व सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. मग आता पुणे पोलीस 156 लोकांपैकी इतर 78 लोकांवर इतकी का मेहरबान झाली? फक्त 78 लोकांवर कारवाई केली मग इतर 78 लोकांना का सोडण्यात आले? फक्त 29 लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? यातून पुणे पोलिसांचा दुटप्पीपणा दिसत आहे.

इतर लोकांना सोडले ते काय आमदार, खासदारांचे मुलं होती का? की हाय प्रोफाइल लोक होती जी सरकारला मदत करतात? पोलीस सांगत आहेत की या पार्टीची परवानगी घेण्यात आली होती पण परवानगीचा एक साधा पेपर दाखवला जात नाही. ना अद्याप कारवाईचा एखादा व्हिडिओ समोर आला आहे. प्रांजल यांच्या प्रकरणात व्हिडिओ बाहेर पाठवले जात होते. मीडियाला माहिती पुरवून मीडिया ट्रायल चालवला जात होता‌, असे गंभीर आरोप करत असतानाच त्यांनी पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसं पुणे पोलीस वागतं आहे का? असा सवालही उपस्थित केला होता.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Amravati Vidhan Parishad Election 2026: ‘मी नव्हे तर यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज’; काँग्रेसच्या हर्षजीत देशमुखांचा पलटवार, रुग्णालयातून काय-काय म्हणाले?

Comments are closed.