Mahesh Tilekar On Ajit Pawar: ‘अजित पवारांनी अनेक कलाकारांना मदत केलीय, पण कोणीच उल्लेख करत नाही…’; पाणावलेल्या डोळ्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शकानं व्यक्त केलीय खंत

महेश टिळेकर अजित पवारांवर मराठी मनोरंजनविश्वातील (Entertainment World) ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर (Mahesh Tilekar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि ठाम भूमिकांसाठी ओळखले जातात. ‘मराठी तारका’सारखा (Marathi Taraka) लोकप्रिय कार्यक्रम देऊनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केलीय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Late Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याबद्दल बोलताना एक वेगळाच पैलू समोर आणलाय. महेश टिळेकर म्हणाले की, अजित दादांनी (Ajit Pawar) मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना विविध प्रसंगी आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर मदत केलीय. मात्र, त्यांनी केलेल्या या मदतीचा उल्लेख फारसा कुणी करत नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मदत करून त्याचा गवगवा न करणं, ही अजित पवारांची खास शैली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करणाऱ्या अजित पवार यांच्याबाबत बोलताना महेश टिळेकर भावूक झालेले.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिलेली. या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणालेले की, अजितदादांनी अनेक कलाकारांना अडचणीच्या काळात आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर मदत केलीय, पण त्याबद्दल सार्वजनिकरीत्या फार कमी लोक बोलतात. मदत करून त्याचा गवगवा न करणं, ही अजित पवारांची खास शैली असल्याचंही त्यांनी सांगितलेलं.

महेश टिळेकर अजित पवारांबाबत नेमकं काय म्हणाले? (Mahesh Tilekar On Ajit Pawar)

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर म्हणाले की, “एक सुनीता पवार म्हणून बाई आहेत, त्या बांधकामाचं काम करत असताना त्यांचे हात गेले. त्यामुळे त्या अपंग झाल्या आणि नवरा त्यांना सोडून पळून गेला. त्याचा मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आणि तो खूप व्हायरल झालेला. ‘हवाहवाई’ सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशनसाठी मी आणि वर्षा उसगांवकर त्यांच्या पत्र्याच्या घरी गेलेलो. तेव्हा त्यांनी डोक्यावर छप्पर असावं, अशी इच्छा व्यक्त केलेली. त्यांना दोन मुलं होती. त्यांचा व्हिडिओ मी सोशल मीडियावर अपलोड केला. खूप लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली. माझ्या व्हिडिओ टाकण्यानं त्यांना मदत झाली, ह्याचं समाधान मला होतंच, पण तिला घर कसं मिळवून देता येईल, असा विचार होता…”

अजितदादांनी अनेक कलाकारांना मदत केलीय. पण कोणीच त्याचा उल्लेख करत नाही : महेश टिळेकर

“सुनीताला घर मिळवून देण्यासाठी मी आणि आशा पारेख एका मंत्री महोदयांकडे प्रयत्न करत होतो. त्या मंत्री महोदयांनी आज भेटू, उद्या भेटू, सहा-सात महिने टोलवलं. मग, मी अजित दादांकडे शब्द टाकला. त्यांची आणि माझी 2012 पासून ओळख होती. त्यांचा पिंपरी-चिंचवडला एक कार्यक्रम होता. तिथे मी सुनीताला पाठवलं, ती दादांना भेटली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सुनीताकडून अजित दादांनी अर्ज लिहून घेतला आणि म्हणाले होईल. दीड महिन्याच्या आत तिचं काम झालं. दादांनी अनेक कलाकारांना मदत केलीय. पण कोणीच त्याचा उल्लेख करत नाही. त्यांना वाटतं की, एका पक्षाचं नाव घेतलं की, दुसऱ्या पक्षाचा नाराज होईल. काय संबंध? तुम्ही पक्ष बघू नका, ती व्यक्ती बघा. मदत केलेल्या व्यक्तीची जाणीव ठेवा…”, असं महेश टिळेकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूड अभिनेत्रीचं वादळी आयुष्य, सहा लग्न मोडल्यानंतर सातव्यांदा थाटला संसार, पण नशीबी आली सवत, आयुष्यभर केला तडजोडीचा संसार

एबीपी माझाच्या बातम्या :

Comments are closed.