Bhaskar Jadhav : “भाजपला रोखण्यासाठी देशात ‘महिला पंतप्रधान’ चेहरा जाहीर करा, चमत्कार घडेल, एक चेहरा दिसतोय पण…”; भास्कर जाधवांचं भुवया उंचावणारं वक्तव्य
चिपळूण: “देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि भाजपला सक्षम शह देण्यासाठी आता विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एखाद्या ‘महिलेचे’ नाव समोर आणण्याची गरज आहे. जर महिला पंतप्रधान म्हणून नाव जाहीर झाले, तर देशाच्या राजकारणात मोठा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही,” असे मोठे आणि खळबळजनक विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केले आहे. “मला महिला पंतप्रधान म्हणून एक चेहरा दिसतोय, मात्र त्याबद्दल मी आताच बोलणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी सस्पेन्स वाढवला आहे.(Bhaskar Jadhav) चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि महायुतीमधील अंतर्गत वादावर बोट ठेवत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Bhaskar Jadhav : “एकनाथ शिंदेंच्या जागांवर भाजपनेच बंडखोर उभे केले”
महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणावर बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिस्थितीवर टोमणा मारला. “बंडखोर उभे करणे ही भाजपची जुनीच रीत आहे. जिथे जिथे एकनाथ शिंदेंना उमेदवारी देण्यात आली, तिथे तिथे भाजपने आपले बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. एकनाथ शिंदे यांना १७ पैकी १० जागा पाहिजे होत्या, पण त्यांच्या पदरात केवळ ४ जागा पाडल्या गेल्या. आता शिंदेंचा उमेदवार निवडून आला तर ते आमच्यामुळेच आला, असा दावा भाजप करेल,” अशी घणाघाती टीकाही भास्कर जाधव यांनी शेवटी केली.
भास्कर जाधव: “आयुष्य मोठे असले पाहिजे, लांब नाही…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. यावर अभिनेते राजेश खन्ना यांचा प्रसिद्ध डायलॉग मारत भास्कर जाधव यांनी टोला लगावला. “बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये… लंबी नही! दिवस मोजून कोणाचे कर्तृत्व सिद्ध होत नाही. खुर्चीवर किती दिवस बसलो याचा आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा, आपल्या कारकिर्दीत देशवासीयांना काय सुख आणि आनंद दिला याचे मूल्यमापन पंतप्रधान आणि सरकारने करावे,” अशी टीका जाधव यांनी केली.
Bhaskar Jadhav : ‘सलग’ हा शब्द भाजपच्या सोयीचा!
पंतप्रधानांच्या कार्यकाळाच्या विक्रमावर आक्षेप घेताना जाधव म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ मध्ये देशाचा ध्वज फडकवला, तेव्हापासूनचे त्यांचे दिवस मोजले जातात. इंदिरा गांधी देखील मोदींपेक्षा जास्त काळ पंतप्रधान राहिल्या आहेत, मात्र त्या सलग राहिल्या नसल्याने भाजप त्यांचे दिवस मोजत नाही. ‘सलग’ हा शब्द केवळ भाजपच्या सोयीचा आहे. वास्तविकता पाहता नेहरू आणि गांधी यांच्यापेक्षा मोदींचा पंतप्रधान म्हणून एकूण कार्यकाळ जास्त नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींच्या माध्यमातून मोदींच्या कामाचा लेखाजोखा मांडला, पण त्याचा खरा डेटा लोकांसमोर आणलाच नाही.”
Bhaskar Jadhav : लोकशाही समोरील मोठे संकट
देशातील निवडणूक प्रक्रियेवर चिंता व्यक्त करताना भास्कर जाधव म्हणाले, “समस्त देशवासीयांनी आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. मतदारांचा मतदानाचा हक्क पद्धतशीरपणे संपुष्टात आणला जात आहे. अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध करून मतदानाचे महत्त्व कमी केले जात आहे, हे भविष्यातील लोकशाहीसाठी मोठे संकट आहे. देशात अंधभक्तांची संख्या प्रचंड वाढली आहे; पेट्रोल, डिझेल, खत आणि नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांना लागलेल्या रांगा या अंधभक्तांना दिसत नाहीत, हीच देशाची खरी अधोगती आहे.”
भास्कर जाधव : गिरीश महाजन कुणाला तरी मंत्रिपदाचा गराडा घालत आहेत….भास्कर जाधव
भाजपला महात्मा गांधींचा खून झाला त्यात दुःख वाटत नाही, इंदिरा गांधींचा खून झाला याचं दुःख वाटत नाही, राजीव गांधी यांचा खून झाला त्याचे वाईट वाटत नाही. पण पंजाबमध्ये जाऊन गिरीश महाजन यांच्यासारखे किंमत नसलेले लोक इंदिरा गांधी यांचा खलिस्तानी लोकांनी खून केला त्याचे समर्थन करतात, याचा अर्थ हे राष्ट्रप्रेमी नाहीत तर राष्ट्रद्रोही आहेत हे पुन्हा सिद्ध झालं असं म्हणत भास्कर जाधव यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.