ऋतुराज गायकवाडने तोडला किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'या' यादीत पहिल्या स्थानावर विराजमान
भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या अ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अ संघांमध्ये तिरंगी वनडे मालिका खेळली जात आहे. यातील सलग दुसऱ्या सामन्यात त्याने उल्लेखनीय खेळी केली आहे. त्याने आज (गुरूवार, ११ जून) अफगाणिस्तानविरुद्ध ६६ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने विराट कोहलीचा जागतिक विक्रम मोडला आहे.
ऋतुराजची लिस्ट ए मधील कामगिरी पाहिली तर त्याने ५९.३९ च्या सरासरीने ५२२७ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये किमान ५००० धावा करणाऱ्या फलंदाजांमधील त्याची सरासरी सर्वोत्तम आहे. यामुळे या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. विराटची लिस्ट ए ची कारकिर्द पाहिली तर त्याने ५७.९१ च्या सरासरीने १६,४४७ धावा केल्या आहेत. तसेच लिस्ट ए मध्ये किमान ५००० धावा करताना सर्वात्तम सरासरी असलेल्या यादीत मायकल बेवन, चेतेश्वर पुजारा आणि एबी डिविलियर्स यांचाही समावेश आहे.
लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरी (किमान ५००० धावा)-
५९.३९ – ऋतुराज गायकवाड (५२२७ धावा)
५७.९१ – विराट कोहली (१६४४७ धावा)
५७.८६ – मायकल बेवन (१५१०३ धावा)
५७.०१ – चेतेश्वर पुजारा (५७५९ धावा)
५३.५२ – खुर्रम मंजूर (७९२२ धावा)
५३.४७ – एबी डिव्हिलियर्स (१११२३ धावा)
५३.३९ – बाबर आझम (९७७२ धावा)
५३.३९ – जेम्स टेलर (५३६५ धावा)
53.00 – शान मसूद (6413 धावा)
५२.३० – सलीम इलाही (६२७७ धावा)
५१.२५ – शुभमन गिल (५२२८ धावा)
५०.३८ – एमएस धोनी (१३३५३ धावा)
भारत अ संघाने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. सामन्याआधी थोडा पावसाचा व्यत्यय आला, मात्र वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी संघाल चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी सलामीसाठी ७४ (४३) धावांची भागीदारी केली. वैभव ४४ (२२) आणि प्रभसिमरन ८४ (६९) धावा करत बाद झाले. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार ऋतुराजने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४९ षटकांत ९ विकेट्स गमावत ३४९ धावासंख्या उभारली, पावसामुळे सामना पुन्हा थांबवण्यात आला आहे.
Comments are closed.