सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्
Nanded Crime Aanchal Mamidwar: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांना आचल आणि सक्षम ताटेचे (Saksham Tate) प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे आचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या (Murder news) केली होती. यानंतर आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. त्याचे व्हिडीओ देशभरात व्हायरल झाले होते आणि हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गाजले होते. त्याच प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागला. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली आहे. अलीकडेच सक्षमच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या पडलेल्या सक्षम ताटेच्या आईची अवस्था वाईट झाली आहे. (Nanded Crime news)
सक्षमची आई संगीता ताटे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सक्षमची हत्या झाली होती, तेव्हा आंचल म्हणाली होती, ‘मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. तुमच्यासोबतच राहीन. तुमची काळजी घेईन. ती साडेतीन महिने सोबत राहिली. एक दिवस अचानक म्हणाली- ‘आजीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला त्यांना भेटायला जायचे आहे’. इथून काही अंतरावर तिचं घर आहे. मी तिला पोहोचवून आले. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आजीकडे जाण्यापूर्वी आंचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती. ती काय बोलायची? कुणाशी बोलायची? यावर आम्ही काहीही बंधनं ठेवली नव्हती. पण त्यानंतर ती घरी निघून गेली आणि परत आली नाही. यानंतर सक्षमच्या वडिलांची देखील प्रकृती ढासळत गेली. त्यांना बीपीचा त्रास होत होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. सध्या आंचलसोबत आपला कसलाही संपर्क नाही, असंही संगिता ताटे यांनी सांगितले.
Nanded crime: ‘सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन’
सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच वादातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून संपवले होते. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले होते. यावेळी आंचलने म्हटले होते की, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे, असे आंचल मामीडवार हिने सांगितले होते.
आणखी वाचा
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.