वैभव सूर्यवंशीला टीममध्ये संधी मिळाली, 12 वा खेळाडू म्हणतो मला संधी कधी, मुंडेंची तुफान बॅटिंग

धनंजय मुंडे: अजित पवार यांनी माझ्यासारख्या रस्त्यावरच्या खड्याला घडवलं. तीच दृष्टी आता मला सुनेत्रा पवारांमधे पाहायला मिळत असल्याचे मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (धनंजय मुंडे) यांनी व्यक्त केले. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक नंबरचा करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. मगापासून इथे खेळाचा विषय सुरु आहे. आज समोर बसलेल्या लोकांची भावना मी मांडणार आहे. स्टेजवर बसलेल्या लोकांना संधी मिळाली आहे. समोर बसलेले म्हणतायत क्रिकेटच्या खेळाडूतील आम्ही फक्त 12 व्या स्थानीच राहणार का? आम्हाला कधी संधी मिळणार? मी तुमच्या भावना मांडल्या आहे. मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या धनंजय  मुंडे यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली.

कार्यकर्त्याच्या कर्तृत्वला, निष्ठेला, त्याच्या कामाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक नंबर नेण्यासाठी सर्वांनी संघर्ष आणि संकल्प करण्याची गरज आहे. स्टेजवर सर्व खेळाडू आहेत. मात्र समोर बसलेले देखील खेळाडू आहेत. ते पाहत आहेत आम्हाला कधी संधी मिळणार याची वाट पाहत आहे. मात्र मी कायम 12 वा खेळाडू राहणार आहे याची जाणीव आहे. खेळत राजकारण असो किंवा राजकारण असो एक मात्र निश्चित आहे, ज्या सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप जिंकून दिला त्यालासुद्धा संघात स्थान मिळालं नाही आणि वयाच्या 15 वर्षीसुद्धा  वैभव सूर्यवंशीला संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वला, कार्यकर्त्याच्या निष्ठेला, त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे, तरच अजितदादांचे महाराष्ट्रातील स्वप्न आपण पूर्ण करु असे धनंजय मुंडे म्हणाले.

Comments are closed.