Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT

Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT

याच षणमुखानंद हॉल मधे २७ वर्षापूर्वी पक्षाची स्थापना झाली. देशातून यासाठी कार्यकर्ते आले होते.
मी हे सांगतोय कारण इतिहास माहिती असायला हवा. त्यावेळी काय संघर्ष करण्यात आला हे मनात ठसायला हव.
शरद पवारांना काँग्रेसनी बाहेर काढलं. त्यावेळी ते मिटवता आलं असतं.
त्यावेळी अ १० या सरकारी बंगल्यात मी होतो नव्या पक्षाच्या स्थापनेला सुरुवात झाली.
१ हजार अफेडेव्हीट तयार केले. चिन्ह ठरवलं… समीर, पंकज यांनी हे सगळं केलं..
घड्याळ चिन्ह निश्चित केलं. आधी चरखा ठरला होता मात्र आम्ही घड्याळ चिन्हावर निर्णय घेतला.
कारण चरखा चिन्ह फ्रीज करण्यात आलं होतं

१९ मे १९९९ ला सरकारी बंगल्यात असताना पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे धावतपळत आले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते शरद पवारांचा पुतळा जाळत होते आमच्या कार्यकर्त्यांनी तो ताब्यात घेतला लाट्या काट्या खाल्ल्या. हे सांगतोय कारण आम्ही त्यावेळी संघर्ष केला. अनेक फोन येत होते काँग्रेस मधून येत होते मुख्यमंत्री करू सांगत होते मात्र मी निर्णय घेतला शरद पवारांसोबत राहायच.

आपण सगळ्यांना सोबत पक्ष स्थापन करून वाढवला. सकाळी षणमुखानंद येथे सभा घेतली संध्याकाळी शिवाजीपार्कला सभा घेतली. त्यावेळी पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. त्यावेळी वेळ मिळाला असता प्रचाराला तर आपला मुख्यमंत्री झाला असता. आपण संकल्प करत असताना संघर्षाला देखील उभ राहिला हाव

मागापासून चालू आहे हा खेळ तो खेळ अरे खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणात खेळ आणू नका पक्ष म्हणजे ह्याचा त्याचा नव्हे. कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे पक्ष

शेवटचा माणसापर्यंत पोहचायचे आहेत .. खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका..

कुठे संकट आले की हा बोलेल तो बोलेल असं असेल तर मी पहिले बोलेन.. मतभेद असू शकतात पण मनभेद नाही..

पदं ही अळीवावकचं पाणी कधी निस्टून जाईल सांगता येत नाही.

मतभेद असू शकतात मन भेद नाही.

Comments are closed.