Election 2026: अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 अमरावती: अमरावती विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) दरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच काँग्रेसकडून (Congress) वंचित उमेदवार (Vanchit Bahujan Aaghadi) निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठकींचे सत्र सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. काल (11 जून) रात्री पाठिंबा संदर्भात दोन बैठका पार पडल्यात. यावेळी सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांची अंतर्गत बैठक संपन्न झाली. त्यानंतर वंचितच्या उमेदवारासोबत एक गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काल (11 जून) झालेल्या बैठकीचा तपशील अमरावतीतील काँग्रेस नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कळवतील. त्यानंतर प्रदेश काँग्रेस पाठिंबा संदर्भात निर्णय घेईल, अशी देखील माहिती आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख निवडणूकच्या रिंगणात असल्याचं ठामपणे सांगत आहे. जर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला तर उमेदवार हर्षजीत देशमुख (Harshjit Deshmukh) यांची काय भूमिका असेल? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunil Deshmukh : दवाखान्यात राहून मैदानात आहेअसे शब्द वापरणे योग्य नाही

दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत काँग्रेसचे माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले तेही गोष्ट खरी आहे की आम्ही वंचितच्या उमेदवारासोबत बैठक केलेली आहे. आम्ही सगळ्या गोष्टी तपासूनच उमेदवाराला सांगितले की तुम्ही जर सक्षम असाल तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं आम्ही त्यांना कळविले आहे. हर्षदीप देशमुख म्हणतात मी मैदानात आहे. यावर डॉ सुनील देशमुख म्हणाले की, दवाखान्यात राहून मैदानात आहेअसे शब्द वापरणे योग्य नाही. मैदानात असाल तर इकडे अमरावतीला या तुम्ही रुग्णालयात आहात हे लक्षात ठेवा. यशोमती ठाकूर यांनी जे काल विधान केले, 15 ते 20 कोटी रुपयेमध्ये आमचा उमेदवार मॅनेज झाला, अशी माहिती आहे. त्यावर डॉक्टर सुनील देशमुख म्हणाले की यशोमतीताईकडे काहीतरी पुरावा असेल म्हणूनच त्यांनी हे विधान केलेलं आहे.

Harshjit Deshmukh : मी रुग्णालयात दाखल आहे. हे पक्षाने समजून घ्यावं – हर्षजीत देशमुख

दुसरीकडेहर्षजीत देशमुख अमरावती विधान परिषदेत निवडणुकीच्या मैदानातून माघार घ्यायला तयार नाहीत्यामुळे. काँग्रेस पक्षाने जरी वंचित बहुजन आघाडी किंवा इतर दुसऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला, तरी मी निवडणुकीच्या मैदानातून हटणार नाही. तब्येतीच्या कारणावरून मी रुग्णालयात दाखल आहे. हे पक्षाने समजून घ्यावं, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, हर्षजीत देशमुख यांच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये किडनीमध्ये दोन स्टोन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आजच्या संदर्भातील आवश्यक उपचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षजीत देशमुख यांचा रुग्णालयातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.