प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार नको ते बोलली, KEM रुग्णालयाकडून महत्त्वाचं पाऊल

केईएम हॉस्पिटलचे डीन डॉक्टर सेजल पवार यांच्यावर प्रणित अधिक शोमध्ये वादग्रस्त टिप्पणी: स्टँडअप कॉमेडियन (Stand-Up Comedian) प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधला ‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. या व्हिडीओमुळे प्रणित मोरे यानंही निवेदन जाहीर करून माफी मागितली. पण, हा वाद विकोपाला गेला असतानाच, आता प्रणितच्याच शोमधला आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका डॉक्टर तरुणीच्या आक्षेपार्ह्य वक्तव्याचा हा व्हिडीओ आहे. KEM रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार (Dr. Sejal Pawar) हिनं प्रणित मोरे याच्या शोमध्ये बोलताना मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत अश्लील वक्तव्य केलेलं. या प्रकरणावरुन सध्या जोरदार ट्रोलिंग होत असून प्रणित मोरे, 370 रुपयांच्या बिर्याणीवर वक्तव्य करणारा हिमांशु जांगडा आणि मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य करणारी डॉक्टर सेजल पवार यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य केल्या प्रकरणी सेजल पवार ज्या रुग्णालयात लास्ट ईयरचं शिक्षण घेतेय, त्या KEM रुग्णालयानं याप्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश देत, चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर कारवाई केली जाईल, असं रुग्णालयाच्या डीनचं म्हणणं आहे.

KEM रुग्णालयाचे डीन नेमकं काय म्हणाले? (KEM Hospital Dean On Sejal Pawar)

केईएम रुग्णालयाचे डीन हरिश पाठक म्हणाले की, “आमच्यापर्यंत माहिती आली की, सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होतेय. आमच्याकडे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं मृतदेहांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केलीय, याबाबत आम्ही फारच संवेदनशील असून, घडला प्रकार अत्यंत आक्षेपार्ह्य आहे… त्यामुळे आम्ही वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या शोचा संपूर्ण एका तासाचा व्हिडीओ आहे, जो ते तपासतील आणि त्या विद्यार्थीनीचंही स्टेटमेंट घेतलं जाईल, अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू…”

डॉक्टर सेजल पवारच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणासंदर्भात चौकशीचे निर्देश

केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवार हिच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीनं तपास प्रक्रियेला गती दिली आहे. या समितीत पदवीपूर्व वसतिगृहाच्या वॉर्डन आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता चालक, तसेच मेडिसीन विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रद्धा मोरे यांचा समावेश आहे. डॉ. मोरे या केईएमच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीनं त्या कार्यक्रमाचं संपूर्ण रेकॉर्डिंग तपासलं आहे. याच कार्यक्रमातून तो दोन मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ तयार झाला होता. सोशल मीडियाच्या वापराबाबत नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही चौकशी केली जात असल्याचं समजतंय. या तपासाचा अहवाल केईएम हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांकडे (Dean) सादर केला जाणार आहे, त्यानंतरच योग्य ती पावलं उचलली जातील, असं अधिष्ठात्यांचं म्हणणं आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर, या प्रकरणातील पुढील कारवाईबाबतचा निर्णय अधिष्ठात्यांच्या स्तरावर घेतला जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Doctor Sejal Pawar Controversial Comment In Pranit More Show: प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर तरुणीचं अश्लील बोलणं, ट्रोल झाल्यानंतर व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एबीपी माझाच्या बातम्या LIVE:

Comments are closed.