प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ, थेट राष्ट्रीय महिला आयोगाने आदेश काढला, पोलिसांना कारवाईच्या सूचना

प्रणित अधिक वाद: स्टँड अप कॉमेडियन समय रैनानंतर (Samay Raina) आता प्रणित मोरे (Pranit More) सध्या आपल्या शो आणि विनोदामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  प्रणित मोरेच्या (Comedy Show) शोमध्ये हिमांशू  जांगडा नावाच्या तरुणानं  एका महिलेला डेटवर नेल्याचा अनुभव सांगितला.  त्यानं केलेल्या विधानानंतर हिमांशू  जांगडा प्रचंड ट्रोल झाला. तसेच प्रणित मोरेवरही संतापाची लाट उसळली. विनोदाला आता मर्यादा उरलेली नाही,  असं म्हणत नेटकऱ्यांनी दोघांनाही धारेवर धरलं. या प्रकरणानंतर प्रणित आणि हिमांशू दोघांवर कारवाई झाली पाहिजे अशी चर्चा होऊ लागली. यानंतर मुंबई पोलिसांनी ‘प्रणित मोरेच्या 370 बिर्याणी’च्या वादावर पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, आता थेट राष्ट्रीय महिला आयोगाने कारवाईचे आदेश काढले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून प्रणित मोरेला दणका, थेट आदेशच काढला (Pranit More Controversy News)

प्रणित मोरे सध्या गुरुग्राममध्ये पार पडलेल्या शोमुळे अडचणीत सापडला आहे. गुरुग्राममधील कॉमेडी शोमध्ये हिमांशू  जांगडा या तरुणानं एका महिलेसोबत डेटवर जाण्याचा अनुभव सांगितला.  या व्हिडीओमुळे प्रकरण अधिकच चिघळलं. अनेक स्तरातून दोघांवर टीकेचे बाण सोडण्यात आले. दरम्यान, आता प्रणित मोरेच्या आणखी अडचणीत वाढ होणार आहे.  राष्ट्रीय महिला आयोगाने प्रणित मोरे आणि या प्रकरणाच्या निगडीत थेट आदेश काढले आहेत. पोलिसांना कारवाईच्या सूचना देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना (DGP) कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्रणित मोरे आणि हिमांशू  जांगडा या दोघांना 22 जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स दिले आहेत. सध्या या प्रकरणात प्रणित मोरेच्या अडचणीत आणखी कोणती वाढ होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

प्रणित मोरे प्रकरणावर मुंबई पोलिसांची पोस्ट चर्चेत (Mumbai Police on Pranit More Case)

प्रणित मोरे प्रकरणावर मुंबई पोलिसांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये 370 हा आकडा मोठ्या आकारात लिहिण्यात आला आहे.  शून्यच्या  जागी बिर्याणीची प्लेट दाखवण्यात आली आहे. 370च्या खाली  ‘370 रुपयांत बिर्याणी मिळू शकते, पण आमच्या लॉकअपमध्ये मुक्कामासह मोफत जेवण मिळेल’… ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘Its Your Choice’, असं लिहिलं आहे. मुंबई पोलिसांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा होत आहे, तसेच कौतुकही होत आहे. ‘

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आता छोटा गुलिगत येणार, सूरज चव्हाण होणार पप्पा; हटके स्टाईलमध्ये दिली गुडन्यूज, नेटकऱ्यांकडून ट्रोल कारण…

Comments are closed.