शेगांव कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने धडक मोहीम राबवली जात आहे. एफडीएकडून राज्यभरात छापेमारी सुरू असून शेगांव येथील प्रसिद्ध शेगांव कचोरी सेंटरवरही बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला आहे. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यात भेसळ आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.

तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्या पासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात जोरदार मोर्चा खोवला आहे. नियम पायदळी तुडवत मनमानीपणा करणाऱ्या व्यावसायिकांना दणका देण्यास एफडीएने सुरूवात केली असून राज्यातील विविध ठिकाणच्या आस्थापनांवर छापेमारी केली आहे. यात दोषी आढळणाऱ्या अटक करून अनेक आस्थापनांना टाळेही ठोकण्यात आले आहे.

दरम्यान, या कारवाया यापुढेही सुरुच राहणार असून भेसळ किंवा अनधिकृत कारभार करून जनतेच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ आमच्याकडे तक्रार करा असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’ला एफडीएचा दणका, आरोग्याला घातक 114 किलो अन्नसाठा जप्त

Comments are closed.