शेअर बाजारात 10 लाख कोटींचा पाऊस, Sensex 1695 अंकांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराने दरम्यानच्या संभाव्य शांतता करारामुळे (US-Iran Peace Deal) जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत मिळाले आणि गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर खरेदी केली. या तुफान खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढल्याचं दिसून आलं.

शुक्रवार, व्यापारी सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स 1695.40 अंकांच्या म्हणजे 2.30 टक्क्यांच्या ऐतिहासिक उसळीसह 75,527.95 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50′ हा 461 अंकांच्या (1.99%) वाढीसह 23,622.90 वर स्थिरावला.

Stock Market Key Drivers : बाजारातील ऐतिहासिक तेजीची मुख्य कारणे

बाजार सुरू होण्यापूर्वीच अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळून शांतता करार होण्याची बातमी आली होती. त्यामुळे बाजार एका टक्क्यांच्या वाढीसह उघडला. मात्र, बाजाराच्या शेवटच्या 2 तासांत या कराराबाबत आणखी सकारात्मक अपडेट्स आल्याने खरेदीचा जोर वाढला आणि निर्देशांक 2 टक्क्यांच्या पार गेले.

मुख्य निर्देशांकांसोबतच व्यापक बाजारातही मोठी खरेदी झाली. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 हे दोन्ही निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

Stock Market Sectoral Indices : आयटी वगळता सर्वच सेक्टरमध्ये ‘दिवाळी’

आजच्या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘निफ्टी आयटी’ (IT) मध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली, परंतु इतर सर्व प्रमुख सेक्टर्सनी बाजाराला एवढा भक्कम पाठिंबा दिला की आयटीच्या घसरणीचा बाजारावर काहीच फरक पडला नाही.

पीएसयू बँक (PSU Banks) आणि प्रायव्हेट बँक (Private Banks) च्या निर्देशांकात प्रत्येकी अडीच टक्क्यांहून अधिक तेजी होती. निफ्टी रियल्टी निर्देशांक सर्वाधिक 3.53 टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी ऑटोमध्येही जवळपास 2 टक्क्यांची मजबूत वाढ झाली.

Stock Market Investors Wealth : गुंतवणूकदारांची संपत्ती 10.22 लाख कोटींनी वाढली

शेअर बाजारातील या जबरदस्त तेजीमुळे बीएसईवर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप (Market Capitalization) एकाच दिवसात गगनाला भिडले.

11 जून 2026 चे मार्केट कॅप : ₹4,51,83,025.178 कोटी

12 जून 2026 चे मार्केट कॅप : ₹4,62,05,607.73 कोटी

आजच्या या संपत्तीच्या पावसामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात थेट 10,22,582.552 कोटी (सुमारे 10.22 लाख कोटी रुपये) चा मोठा फायदा झाला.

Top Gainers & Losers : सेन्सेक्सचे केवळ 2 शेअर्स घसरले

सेंसेक्समधील 30 प्रमुख शेअर्सपैकी तब्बल 28 शेअर्स आज हिरव्या चिन्हात (Gainers) बंद झाले, तर केवळ 2 शेअर्स लाल चिन्हात (Losers) राहिले.

टॉप गेनर्स (Top Gainers) : बजाज फायनान्स (Bajaj Finance), लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि इंडिगो (IndiGo) चे शेअर्स आज सर्वाधिक तेजीसह बंद झाले.

टॉप लूझर्स (Top Losers) : टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि पॉवरग्रिड (PowerGrid) हे दोनच शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाले.

बीएसईवर आज एकूण 4,422 शेअर्सचे टेंडिंग झाले. यापैकी तब्बल 3,234 शेअर्सच्या किमतीत वाढ झाली, तर 1,030 शेअर्स घसरले आणि 158 शेअर्स स्थिर राहिले. विशेष म्हणजे, आजच्या या तेजीच्या लाटेत 102 शेअर्सनी आपापला 1 वर्षाचा उच्चांक (52-Week High) गाठला, तर 79 शेअर्स 1 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले.

Comments are closed.