नाशिक TCS प्रकरणात MIM नंतर मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री, न्यायालयात वकील दिला; आसिफ श

नाशिक TCS प्रकरण: नाशिक (Nashik) येथील बहुचर्चित टीसीएस (TCS Case) कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे. ‘एमआयएम’ (MIM) पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी यापूर्वी आरोपींना आश्रय दिल्याचे उघड झाले असतानाच, आता मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने (Islam Party) या प्रकरणात एन्ट्री केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना आता इस्लाम पार्टीकडून कायदेशीर मदत पुरवली जात आहे. आज नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) स्वतः न्यायालयात हजर होते.

इस्लाम पार्टीने या खटल्यासाठी स्वतंत्र वकील दिला असून, त्यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयात आरोपी दानिश शेख याची बाजू मांडली. “हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरीही इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई लढणार,” अशी घोषणा माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

नाशिक TCS प्रकरण: आरोपी दानिश शेखच्या वकिलांची प्रतिक्रिया

आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “निदा खान प्रकरणी आम्ही दानिश याच्या वतीने उपस्थित होतो. सरकारी वकील, फिर्यादी वकील आणि आम्ही संयुक्त युक्तिवाद केला. कोर्टात अनेक मुद्दे उपस्थित केले. दानिश याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर एमसीआर केला. दानिश याचा अर्ज पहिल्यांदाच केला आणि तो फेटाळण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिक TCS प्रकरण: आसिफ शेख काय म्हणाले?

इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख म्हणाले की, “टीसीएस प्रकरण नाशिकमध्ये झाले, त्यात धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी सर्व काम करत होते, त्यांच्यात मैत्री होती. त्याला धार्मिक रूप दिले गेले. काही जातीवादी लोकांनी हे काम केले. दानिश शेख याच्या घरचे आमच्याकडे आले, ते घाबरले होते. आम्ही वकील दिला, ते काम पाहत आहेत. माझ्या घराचे कागदपत्र व्यवस्थित आहे. धार्मिक रंग दिला जात असेल तर आम्ही राजकारणी मदत करत होतो. आम्ही पुढे देखील अशी लढाई लढू. ही लढाई नाशिक कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली तरी आम्ही आणि इस्लाम पार्टी उभे राहू,” असे त्यांनी म्हटले.

Nashik TCS Case: आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला सुनावणी

नाशिकमधील या कथित कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्यासह इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आता 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेण्यात आली. कोर्ट आता 19 जून रोजी या जामीन अर्जावर निकाल देणार आहे. तत्पूर्वी, या सुनावणीसाठी याआधीही दोन वेळा तारीख देण्यात आली होती. या आगामी सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजूही ऐकून घेतली जाणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ashok Kharat Case: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Comments are closed.