सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास पाडलं भाग, कोल्हापूर जिल्हा हादरला

कोल्हापूर क्राईम न्यूज : कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओळखीच्या एजंटकडे महिलेला सोपवून व्याजाची वसुली केली आहे. अडचणीच्या काळात ऊसने घेतलेल्या पैशावर भरमसाठ व्याज लावल्याचे समोर आले आहे.

7 हजार रकमेवर आतापर्यंत दीड लाख रुपयांचे व्याज आकारले

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 7 हजार रकमेवर आतापर्यंत दीड लाख रुपयांचे व्याज आकारले आहे.  हॉटेल मध्येही काम करण्यास भाग पाडले. इचलकरंजीत एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फक्त सात हजार रुपयांच्या रकमेवर दीड लाख रुपयांचं व्याज आकारल्यानं नागरिकांमधून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे.

Comments are closed.